चीननं बीबीसीचं नाव घेऊन परदेशी माध्यमांना दिला इशारा

फोटो स्रोत, Mahmut Atanur/Anadolu Agency/Getty Images
बीबीसीचे प्रतिनिधी जॉन सडवर्थ यांनी चीन सोडण्याच्या प्रक्रियेवर चीन सरकारनं प्रश्न उपस्थित केले आहेत.
शुक्रवारी (2 एप्रिल) चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी म्हटलं की, "जॉन सडवर्थ हे अनौपचारिक पद्धतीने देश (चीन) सोडून गेले. त्यांनी संबंधित प्रशासनाला याबाबत माहिती दिली नाही आणि औपचारिकताही पूर्ण केली नाही."
"शिनजियांग प्रांतातील लोक त्यांच्याबाबत तक्रार दाखल करतील, याची त्यांना चिंता होती, तर त्यांनी इथं राहून लढायला हवं होतं. विशेषत: ते बनवाट अहवाल दाखवलं नसल्याचा दावा करत असताना तरी," असं चीननं म्हटलंय.
"त्यांना त्यांच्या सुरक्षेची काळज होती, तर त्यांनी पोलिसांशी संपर्क करायला हवा होता. पण त्यांनी पळण्याचा निर्णय घेतला. का? ते इतक्या घाईघाईत चीनमधून निघून का गेले? त्यांना कसली भीती होती? आम्हाला याचं एकच कारण आढळतं, ते म्हणजे अपराधी असल्याची भावना," असंही चीननं म्हटलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं बीबीसीवर कोरोना आणि शिनजियांकशी संबंधित 'खोट्या बातम्या' चालवल्याचा आरोप केला आहे. प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी आरोप केलाय की, बीबीसीने जाणीवपूर्वक चीनला निशाणा बनवलाय.
चीन सरकारनं जॉन सडवर्थ यांचं प्रेस कार्ड रद्द केलं असून, निवासी पत्रकार म्हणून त्यांचा असलेला दर्जाही काढून घेतला आहे.

हुआ चुनयिंग पुढे म्हणतात की, "जॉन सडवर्थ यांनी चीन सोडल्यानंतर ज्याप्रकारे चीनच्या कम्युनिस्ट पार्टीवर आरोप करण्याचा प्रयत्न केला आहे, हे एक उत्तम उदाहरण आहे की, सत्याची छेडछाड करून कशाप्रकारे दुसऱ्यावर आरोप लावले जातात."
"चीन तुम्हाला आवडो वा न आवडो, पण आम्ही तुम्हाला अफवा पसरवण्यास आणि चीनच्या प्रतिष्ठेवर डाग लावण्याची परवानगी देणार नाही. दुसऱ्या देशातून चीनमध्ये वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना आम्ही सुविधा देतो, मदत करत आलो आहे," असंही हुआ चुनयिंग यांनी म्हटलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
तर परदेशी पत्रकारांशी बोलताना हुआ चुनयिंग यांनी म्हटलं की, "तुमच्या पैशाची नैतिकता कायम ठेवा. त्याचं उल्लंघन करू नका. माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली खोट्या बातम्या आणि दुर्भावना मिसळून चीनला घेरण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही."
दरम्यान, यानंतर बीबीसीच्या प्रेस टीमनं ट्विटरवरून आपली बाजू मांडली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
बीबीसी न्यूज प्रेस टीमनं म्हटलंय की, "चीनमधील आमचे प्रतिनिधी जॉन सडवर्थ यांनी कौतुकास्पद काम केलं आहे. बीबीसीला त्यांचा अभिमान आहे. जॉन यांनी ते सत्य जगासमोर आणण्याचं काम केलं, जे चीन जगापासून लपवून पाहत होता."
जॉन सडवर्थ यांनी बीबीसीनं बीजिंगहून तैवानला पाठवलं असून, ते बीबीसीचे चीनचे प्रतिनिधी म्हणून कायम असतील, असं बीबीसीनं 31 मार्च रोजीच स्पष्ट केलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)