बीबीसीकडून पहिल्यांदाच Sportswoman of the year award कार्यक्रमाचं आयोजन

पॅरा- अॅथलीट्ससह देशातील अन्य महिला खेळाडूंचा गौरव करण्यासाठी बीबीसी पहिल्यांदाच Sportswoman of the Year हा पुरस्कार प्रदान करणार आहे.
बीबीसीच्या भारतीय भाषांच्या प्रमुख संपादक रुपा झा आणि बीबीसी आशिया-पॅसिफिकचे बिझनेस डेव्हलपमेंट हेड इंदु शेखर यांनी दिल्लीमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये यासंबंधीची घोषणा केली.
तुमच्या आवडत्या खेळाडूला मत देण्यासाठी इथे क्लीक करा.
भारतासाठी ऑलिंपिक पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू करनम मल्लेश्वरी या पत्रकार परिषदेच्या मुख्य अतिथी होत्या.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
"महिला या कमकुवत असतात, असाच आपल्या समाजाचा दृष्टिकोन आहे. पण खेळांमध्ये सर्वजण समान आहेत. जेव्हा आम्ही खेळत असतो, तेव्हा देशासाठी खेळत असल्यामुळे आम्हाला आदर आणि समाधान मिळतं. #BBCISWOTY सारख्या पुरस्कारांमुळे आमचा आत्मविश्वास वाढतो," असं करनम मल्लेश्वरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटलं.
"आता गोष्टी बदलत आहेत. 1995 साली मी जेव्हा वर्ल्ड चॅम्पियन झाले तेव्हा या खेळांना इतकी प्रसिद्धी नाही मिळायची. पण जेव्हा सिंधु वर्ल्ड चॅम्पियन झाली, तेव्हा चित्रच बदललं होतं. माध्यमांनी इतर क्रीडा प्रकारांना अधिकाधिक प्रसिद्धी द्यायला हवी, जेणेकरून मुली खेळामध्ये त्यांचं करिअर करू शकतील," असंही मल्लेश्वरीनं म्हटलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
जेव्हा मी वेटलिफ्टिंगला सुरूवात केली, तेव्हा फारशी उपकरणं नव्हती. आम्हाला फारसा सपोर्ट नाही मिळायचा. आजही ग्रामीण भागात अशीच परिस्थिती आहे. मी सगळीकडून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न केले. पण फार काही हाताशी लागलं नाही. पण मला अजूनही आशा आहेत, असंही मल्लेश्वरी यांनी म्हटलं.
'बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर' या पुरस्काराची घोषणा पुढील वर्षी मार्च महिन्यात करण्यात येईल.
या पुरस्कारांचं उद्दिष्ट काय?
अधिकाधिक महिला आणि तरुण प्रेक्षक-वाचकांपर्यंत पोहोचण्याचा बीबीसी मराठीचा प्रयत्न आहे. हा पुरस्कार याच प्रयत्नांचा एक भाग आहे.
"कोणत्याही प्लॅटफॉर्मवर बीबीसी पाहणाऱ्या किंवा वाचणाऱ्या 10 मधील एक व्यक्ती ही भारतीय आहे. आमच्या वाचक-प्रेक्षकांसोबतचं हे नातं पुढे नेण्याचाच एक भाग म्हणजे हा कार्यक्रम आहे," असं मत बीबीसी आशिया-पॅसिफिकचे बिझनेस डेव्हलपमेंट हेड इंदु शेखर यांनी व्यक्त केलं.

बीबीसीच्या भारतीय भाषांच्या प्रमुख संपादक रुपा झा यांच्या मते महिला खेळाडूंना मैदानावर विजय मिळविण्यापूर्वी अनेक अडचणींना हरवत पुढं जावं लागतं. आपल्या आवडत्या खेळाडूला मत देण्याचं आवाहन करताना त्यांनी म्हटलं, "देशातील महिला खेळाडूंनी जे मिळवलं आहे, त्याचा सन्मान करणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर या खेळाडूंना ज्या अडचणींचा सामना करावा लागतो, त्यासुद्धा प्रेक्षकांपर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे."
2000 नंतर भारताला जी 13 ऑलिंपिक पदकं मिळाली आहेत, त्यांपैकी 5 महिला खेळाडूंनी कमावली आहेत. 1999 पर्यंत केवळ पुरुषांनीच ऑलिंपिकमध्ये पदकांची कमाई केली होती.
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसचे संचालक जेमी अँगस यांच्या मते, "बीबीसी बातम्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर' याच उद्दिष्टाच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे. हा पुरस्कार म्हणजे भारतीय क्रीडा विश्वात महिलांनी मिळविलेल्या यशाला सन्मानित करण्याची एक संधी आहे.
या पुरस्काराचे मानकरी कसे निवडले जातील?
बीबीसीनं निवडलेल्या ज्युरींनी पुरस्कारासाठी पाच खेळाडूंची नावं निश्चित केली आहेत. ज्युरींमध्ये देशातील अनेक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, क्रीडा तज्ज्ञ आणि लेखकांचा समावेश आहे.
फेब्रुवारी महिन्यात या पाच खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात येईल. तुम्ही बीबीसीच्या कोणत्याही भाषेतील वेबसाईटवर जाऊन या पाच खेळाडूंपैकी आवडीच्या खेळाडूला मत देऊ शकता.
सर्वाधिक मतं मिळविणाऱ्या खेळाडूला दिल्लीमध्ये होणाऱ्या एका सोहळ्यात 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर' हा पुरस्कार देण्यात येईल.

त्याखेरीज क्रीडा क्षेत्रात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या एका महिला खेळाडूला 'लाइफटाइम अचिव्हमेंट अॅवॉर्डही दिलं जाईल.
गेल्यावेळस झालेल्या आशियाई खेळांमध्ये भारताला एकूण 57 पदकं मिळाली होती. त्यापैकी 28 म्हणजे जवळपास निम्मी पदकं महिला खेळाडूंनी जिंकली होती.
या वर्षी दोहा इथं झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतानं मिळविलेल्या 17 पैकी 10 पदकांची कमाई ही महिला खेळाडूंनी केली होती.
आकडेवारीवरुन हे सिद्ध होतंय, की मैदानावर बाजी मारण्यात या मुली कोठेही कमी नाहीयेत. या अॅवॉर्डच्या निमित्ताने तुम्हालाही खेळाच्या मैदानावर बदलत असलेल्या या चित्रात सहभागी होण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात बीबीसीच्या वेबसाइटवर जाऊन यंदा कोण 'स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर' हे ठरविण्यासाठी आवर्जून मतदान करा.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








