इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्यावरील हल्ल्याचा संपूर्ण 'प्लॅन' कुठे आणि कसा झाला?

फोटो स्रोत, Mohammed Hamoud/Getty Images

फोटो कॅप्शन, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचं निधन झालं आहे
    • Author, गॉर्डन कोरेरा
    • Role, सुरक्षा विश्लेषक
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांना ज्या हल्ल्यात ठार करण्यात आले तो हल्ला मध्यरात्री नाही, तर सकाळी झाला.

याचं कारण असं की, अमेरिका आणि इस्रायलने काही तासांपूर्वीच मिळालेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या गुप्त माहितीचा फायदा घेण्याचा निर्णय घेतला होता.

अनेक महिन्यांपासून ते अशा एका संधीची वाट पाहत होते जेव्हा वरिष्ठ इराणी नेते एकत्र भेटू शकतील आणि त्यांना माहिती मिळाली की, खामेनी शनिवारी (28 फेब्रुवारी) सकाळी मध्य तेहरानमधील एका संकुलात असणार आहेत.

त्याच वेळी इतर वरिष्ठ लष्करी आणि गुप्तचर अधिकारी तिथे भेटणार असल्याचे नेमके स्थानही त्यांना समजले होते.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

खामेनींचा माग काढला जात होता

अनेक महिन्यांपासून अमेरिका आणि इस्रायल सर्वोच्च नेत्याच्या हालचालींचा मागोवा घेत होते. त्यांनी वापरलेल्या नेमक्या पद्धती गुप्त आहेत, तरीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याबद्दल संकेत दिले.

"ते आमच्या गुप्तचर माहिती आणि अत्यंत प्रगत ट्रॅकिंग सिस्टमपासून वाचू शकले नाहीत."

ही माहिती एखाद्या मानवी खबऱ्याने दिलेली असू शकते, परंतु इराणी व्यक्तींचे तांत्रिक पद्धतीने ट्रॅकिंग केले जाण्याची शक्यता अधिक आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमने मार-ए-लागो येथील एका तात्पुरत्या युद्ध कक्षातून कार्यक्रमांचे निरीक्षण केले.

गेल्या जूनमधील 12 दिवसांच्या युद्धात इस्रायलने इराणच्या अणू कार्यक्रमाशी संबंधित शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांना लक्ष्य केले होते. तसेच व्यक्तींच्या हालचाली समजून घेण्यासाठी त्यांनी टेलिकॉम आणि मोबाइल फोन सिस्टममध्ये शिरकाव केल्याचेही वृत्त होते.

त्यामध्ये कधीकधी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित असलेल्या अंगरक्षकांच्या हालचालींचा मागोवा घेण्याचाही समावेश होता.

दीर्घकाळात यामुळे हालचालींचा एक "पॅटर्न ऑफ लाईफ" तयार करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या कृतींचा अंदाज लावता येतो आणि समजून घेता येते.

इराणचे अपयश की अमेरिका-इस्रायलची क्षमता?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इराणला माहित होते की, त्यांचे सर्वोच्च नेते शत्रूंच्या निशाण्यावर आहेत. म्हणूनच मध्यंतरीच्या काही महिन्यांत या उणिवा ओळखण्यात, त्या दूर करण्यातील अपयश हे इराणच्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेचे मोठे अपयश दर्शवते किंवा ट्रॅकिंगचे नवनवीन मार्ग शोधण्याची इस्रायल आणि अमेरिकेची क्षमता सिद्ध करते.

इराणी लोकांनी असाही विचार केला असावा की, दिवसा हल्ला होण्याची शक्यता कमी आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, या प्रकरणात गुप्त माहिती सीआयएकडून आली होती, परंतु प्रत्यक्ष हल्ला करण्यासाठी ती माहिती इस्रायलला देण्यात आली होती.

अशीही शक्यता आहे की, त्यांच्यात कामाची विभागणी झाली. त्यामध्ये इस्रायल इराणच्या नेतृत्वाला लक्ष्य करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे आणि अमेरिका लष्करी लक्ष्यांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मिळालेल्या गुप्त माहितीमुळे इराणचे सर्वोच्च नेते आणि इतर अधिकाऱ्यांच्या हालचालींची पुरेशी आगाऊ माहिती मिळाली होती. त्यामुळे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागू शकणाऱ्या विमानांचा वापर करून हल्ल्याचे नियोजन करणे शक्य झाले.

हा केवळ एका नेत्याला संपवण्याचा हल्ला नसून एका व्यापक मोहिमेची सुरुवात करण्याचा संकेत होता. तसेच मिळालेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी तो हल्ला वेळेच्या आधी करण्यात आला.

इस्रायली विमानांना तेहरानला पोहोचण्यासाठी साधारण 2 तास लागू शकतात, परंतु त्यांनी किती दुरून आपली शस्त्रास्त्रे डागली हे स्पष्ट नाही.

जेव्हा निर्णय घेण्यात आला तेव्हा इस्रायली विमानांनी स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.40 च्या सुमारास त्या संकुलावर 30 बॉम्ब डागल्याचे वृत्त आहे.

फोटो स्रोत, Avi Ohayon - GPO/Anadolu via Getty Images

फोटो कॅप्शन, 11 फेब्रुवारी रोजी व्हाईट हाऊसमध्ये इस्रायली पंतप्रधान (डावीकडे) आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (उजवीकडे) यांची भेट.

हे कदाचित यासाठी केले असावे, कारण सर्वोच्च नेते अजूनही त्यांच्या संरक्षणासाठी संकुलाखालील बंकरचा वापर करत होते (जरी हे या राजवटीचे सर्वात खोल बंकर नसल्याचे म्हटले जाते).

लक्ष्यावर अचूक मारा करण्यासाठी आणि बंकरमध्ये खोलवर शिरण्यासाठी अनेक शस्त्रास्त्रांची गरज भासली असावी.

इराणच्या राजधानीतील इतर ठिकाणांवरही हल्ले झाले. यात इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या कार्यालयाचा समावेश होता. त्यांनी नंतर एक निवेदन प्रसिद्ध करून ते सुरक्षित असल्याचे सांगितले.

इराणने 3 वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. त्यात संरक्षण परिषदेचे सचिव अली शामखानी, संरक्षण मंत्री ब्रिगेडियर जनरल अझीझ नसीरझादेह आणि आयआरजीसी कमांडर जनरल मोहम्मद पाकपूर यांचा समावेश आहे.

जेव्हा विमानांनी हल्ला केला, तेव्हा फ्लोरिडातील मार-अ-लागो येथे मध्यरात्र होती, जिथे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प त्यांच्या काही उच्च अधिकाऱ्यांसह परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

सर्वोच्च नेते मारले गेल्याची पुष्टी होण्यासाठी काही तास लागले.

इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळायला काही तासांचा अवधी लागला. मात्र, इराणने अशा परिस्थितीचा अंदाज आधीच बांधला होता.

खामेनी आणि इतर बड्या अधिकाऱ्यांनंतर सत्तेची धुरा कोणाकडे सोपवायची याचे प्लॅन्स आधीच तयार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या कारवाईनंतर आता युद्धाचं चित्र नेमकं कसं बदलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)