BBC Marathi वरील मागील आठवड्यातले खास लेख, जे कदाचित तुमच्या नजरेतून सुटले असतील

फोटो स्रोत, Getty Images

वाचन वेळ: 3 मिनिटे

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या. आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील. पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको. आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले पाच खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील पाच खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे पाच लेख आम्ही येथे देत आहोत.

1. भारतीय मुलांमध्ये लठ्ठपणा का वाढतो आहे?

जगात सर्वाधिक कुपोषित आणि वाढ खुंटलेल्या मुलांची संख्या भारतात आहे, आणि बऱ्याच काळापासून भारत या यादीत पहिल्या स्थानावर आहे. पण आता भारतात लहान मुलांच्या लठ्ठपणाचं प्रमाणही चिंताजनक असून वेळीच उपाय केले नाही, तर हा आजार साथीचं रूप घेऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

14 वर्षांचा मिहीर जैन पहिल्यांदा 2017 साली आपल्या व्हीलचेअरवरून दिल्लीच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आला होता, तेव्हा 'माझा डोळ्यांवर विश्वासच बसला नाही' असं या हॉस्पिटलचे बेरियाट्रिक सर्जन (शरीरावरची अतिरिक्त चरबी काढणारी शस्त्रक्रिया करणारे) डॉ. प्रदीप चौबे सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

ते सांगतात, "मिहीर खूप जास्त लठ्ठ होता. तो धड उभाही राहू शकत नव्हता. त्याचा चेहरा एवढा गुबगुबीत होता की तो धड डोळेही उघडू शकत नव्हता. तेव्हा महिरीचं वजन 237 किलो एवढं होतं आणि त्याचा बॉडी मास इंडेक्स होता 90."

2. लॉन बॉलमध्ये भारतीय महिला संघाला सुवर्ण पदक, हा खेळ नेमका काय आहे?

भारताच्या लॉन बॉल खेळातील महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. भारतीय महिला संघानं 17-10 नं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

या खेळाबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे.

फोटो स्रोत, @Media_SAI

हा लॉन बॉल खेळ असतो तरी कसा? हे आपण जाणून घेऊ

लॉन बॉल हा एक प्रकारचा बॉलिंग गेम आहे. याची सुरूवात इंग्लंडमध्ये तेराव्या शतकात झाली. याचे औपचारिक नियम 18 व्या शतकाच्या शेवटी तयार करण्यात आले. सविस्तर वाचा-खेळाचे नियम

3. तैवान आणि चीन यांच्यात नेमका वाद काय आहे?

चीन आणि अमेरिका यांच्यात अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.

गेल्या 25 वर्षांत अमेरिकेतल्या उच्चपदस्थ नेत्याचा हा पहिलाच तैवान दौरा आहे. चीनने हा दौरा अतिशय धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.

चीनच्या परराष्ट्र राज्यमंत्री शी फेंग यांनी हा दौरा द्वेषपूर्ण असल्याचं सांगून त्याचे गंभीर परिणाम होणार असल्याचा इशारा दिला आहे. चीन हातावर हात देऊन बसणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.

तर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे प्रवक्ता जॉन किर्बी म्हणाले की नॅन्सी पलोसी यांचा चीन दौरा हा वन चायना या धोरणाला अनुसरून आहे. ते संकट असल्याचं भासवण्याची अजिबात गरज नाही.

तैवान हा चीनमधून वेगळा झालेला प्रांत आहे असं ते मानतात आणि चीनला असं वाटतं की तैवान हा शेवटी त्यांच्या ताब्यात येणार आहे. वाचा- तैवानच्या मुद्द्यावरून वाद का?

4. तुमच्या घरावर तिरंगा फडकावणार असाल, तर 'या' 10 गोष्टी लक्षात ठेवा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकावावा, असं आवाहन लोकांना केलं आहे. त्यामुळे सध्या अनेक वाद घडताहेत. अनेकांनी त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरही राष्ट्रध्वज लावला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

मात्र घरी झेंडा फडकावायचा असेल तर त्याचे काही नियम आहेत. त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यावात हे आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी भारताची ध्वजसंहिता काय आहे ते पाहूया.

राष्ट्रध्वज फडकावण्यासाठी ध्वजसंहिता 2002 चं पालन करावं लागतं. तसंच राष्ट्रीय प्रतिक अपमान विरोधी कायदा 1971 चंही पालन करावं लागतं. वाचा- ध्वजसंहिता काय आहे?

5. आमिर खान म्हणतो, 'मी माझे चित्रपट 6 महिन्यापर्यंत तरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर मी येऊ देत नाही, कारण...'

आमिर खान त्याच्या बहुप्रतिक्षित 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

आमिर 4 वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्क्रिन गाजवण्यासाठी सज्ज आहे. त्याचा हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.

फोटो स्रोत, Amir Khan Productions

आमिरचा हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. मात्र त्याचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)