पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून 5 कामगारांचा मृत्यू

पुण्यातील येरवडा भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा लोखंडी स्लॅब कोसळून 5 कामगारांचा मृत्यू झाला.
गुरुवारी (3 फेब्रुवारी) रात्री 11.15 च्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे.
अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागात एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. बांधकाम सुरू असताना स्लॅबची जाळी कोसळली.
त्यावेळी तिथे काम करणारे काही कामगार जाळीखाली अडकले. कटरच्या साहाय्याने जाळी कापून कामगारांना बाहेर काढण्यात आलं.
या अपघातात पाच कामगारांचा मृत्यू झाला तर काही कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करून या घटनेची माहिती सर्वांना दिली. तसेच मदतकार्य सुरू असल्याचे सांगितले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
नरेंद्र मोदींकडून दुःख व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पुण्याच्या घटनेबाबत ट्वीट करून दुःख व्यक्त केलं.
पुण्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील अपघाताबद्दल ऐकून दुःख झालं. घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांचं मी सांत्वन करतो. जखमींची प्रकृती लवकर बरी व्हावी ही प्रार्थना, असं मोदी ट्वीट करून म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
हेही वाचलंत का?

YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)