रोहित सरदाना यांचं निधन, आठवडाभरापूर्वी झालेली कोरोनाची लागण

फोटो स्रोत, Aajtak
वरिष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचं निधन झालं आहे. सरदाना यांना आठवड्याभरापूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती. ते 40 वर्षांचे होते.
24 एप्रिल रोजी ट्वीट करून रोहित सरदाना यांनी माहिती दिली होती की, "सीटी स्कॅनमध्ये आढळून आलंय मला कोरोनाची लागण झालीय."
सरदाना हे सध्या आज तक वृत्तवाहिनीत वृत्तनिवेदक म्हणून कार्यरत होते. आज तक वृत्तवाहिनीवर रोहित सरदाना 'दंगल' नावाचा कार्यक्रम करत असत. आज तक वृ्तवाहिनीपूर्वी सरदाना झी न्यूजमध्ये कार्यरत होते.
आपली तब्येत सुधारत असल्याचंही त्यांनी ट्वीट करून सांगितलं होतं. मात्र, 6 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी रोहित सरदाना यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी रोहित सरदाना यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देणारं ट्वीट केलं आहे. राजदीप सरदेसाई यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलंय की, "मित्रांनो, अत्यंत वाईट बातमी आहे. सुपरिचित वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं निधन झालं आहे. सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता."

फोटो स्रोत, Twitter
काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीही रोहित सरदाना यांना आदरांजली वाहिली आहे. सरदाना यांच्या निधनाच्या वृत्तानं आपल्याला धक्का बसल्याचं आझाद म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
कोरोनामुळे भारतात 100 हून अधिक पत्रकारांचा मृत्यू
कोरोनामुळे भारतातील 100 हून अधिक पत्रकारांनी आपले प्राण गमावले आहेत. 22 एप्रिल 2021 रोजी एकाच दिवशी महाराष्ट्रातील तीन पत्रकारांचं निधन झालं होतं.
अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे यांचं निधन झालं. अशोक तुपे यांचं कोरोना आजारातून बरं झाल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून तुपे यांच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
उस्मानाबाद येथील समय सारथीचे संस्थापक, उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा यांचं आज कोरोनानं हैदराबाद येथे निधन झालं. ते 69 वर्षांचे होते. उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रांत प्रतिनिधी म्हणून सध्या ते कार्यरत होते. महाराष्ट्र टाइम्स या दैनिकाचे उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलं तसेच उस्मानाबाद येथील दैनिक समय सारथीचे ते संस्थापक संपादक होते.
तसंच ठाणे येथील वरिष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे यांचंही पुण्यात कोरोनानं निधन झालं.
राज्यात कोरोनामुळं बळी घेतलेल्या पत्रकारांची संख्या आता 105 झाली आहे, अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेच्या एस. एम. देशमुख, तसंच ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनीही दिली होती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)