बीबीसीच्या 'स्पोर्ट्स हॅकथॉन'द्वारे विकिपीडियावर भारतीय महिला क्रीडापटूंच्या तीनशेहून अधिक नोंदी

काय आहे बीबीसी स्पोर्ट्स हॅकेथॉन? BBC-Wikipedia Hackethon : इंटरनेटवर मिळणार भारतीय महिला खेळाडूंची माहिती

फोटो स्रोत, AFP

वाचन वेळ: 2 मिनिटे

बीबीसीच्या 'स्पोर्ट्स हॅकथॉन' या उपक्रमांतर्गत (हॅकेथॉन म्हणजे विविध तंत्रकुशल व्यक्ती विशिष्ट संगणकीय कामासाठी एकत्र येतात तो मेळावा) आज विकिपीडियावर पन्नासहून अधिक भारतीय महिला क्रीडापटूंशी संबंधित तीनशेहून अधिक नोंदी करण्यात आल्या.

'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर' (ISWOTY) पुरस्काराचा भाग म्हणून हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. महिला क्रीडापटूंची इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती वाढावी, हा या उपक्रमामागील हेतू आहे.

बीबीसीने 13 भारतीय विद्यापीठांमधील 300हून अधिक विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हे काम केलं. इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी, तामीळ आणि तेलुगू अशा सात भाषांमधून हा उपक्रम पार पडला.

प्रख्यात क्रीडा पत्रकार, तज्ज्ञ आणि बीबीसीचे संपादक यांच्या परीक्षकमंडळाने 50 महिला क्रीडापटूंची नावं निवडली. यातील काही क्रीडापटूंबद्दल इंटरनेटवर काहीच माहिती उपलब्ध नव्हती आणि काहींबाबत केवळ मर्यादित माहिती होती आणि तीही केवळ इंग्रजीतच उपलब्ध होती, असं बीबीसीच्या संशोधकीय गटाला आढळलं.

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या हंगामी संचालक मेरी हॉकडे म्हणाल्या: "महिला आणि तरुणाशी संबंधित अधिकाधिक वार्तांकन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, त्यामुळे या उपक्रमातून बीबीसीच्या भारतामधील पत्रकारांनी घेतलेल्या सखोल मुलाखती आणि त्यांनी केलेलं संशोधन यांच्या आधारे मूल्यवान ऑनलाइन ऐवज उभा राहतोय, याचा मला अत्यंत आनंद आहे."

पॅरा-बॅडमिंटनमधील जागतिक विजेत्या मानसी जोशी आणि पारूल परमार, अर्जुन पुरस्कारविजेती कुस्तीपटू दिव्या काकरन, मुष्टियोद्ध्या निखात झरीन आणि एस. कलाईवनी, नेमबाजीतील जागतिक विजेती एलवेनिल वलारिवन, कुस्तीपटू सोनम मलिक, लांब उडीमधील क्रीडापटू शैली सिंग आणि अशा अनेक आघाडीच्या आणि तरुण क्रीडापटूंचा प्रवास लोकांसमोर उलगडण्याचं काम या ऐवजाद्वारे होणार आहे.

दीर्घ काळ विकिपीडियाचे स्वयंसेवक संपादक असलेले संदीप सिंग म्हणाले: "विकिपीडियावरच्या केवळ 18 टक्के चरित्रात्मक नोंदी स्त्रियांविषयीच्या आहेत, आणि स्त्रियांसंबंधी विश्वासार्ह स्त्रोतांचा अभाव, हे यामागचं एक प्राथमिक कारण आहे. बीबीसीसोबत केलेल्या सहकार्यामुळे भारतीय महिला क्रीडापटूंबाबत प्राथमिक स्त्रोत निर्माण करण्यातील दरी भरून निघाली. शिवाय, पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि भारतीय भाषांमधील भावी संपादक म्हणून प्रशिक्षित करण्याचं कामही या उपक्रमाद्वारे होतं आहे."

शेकडो विद्यार्थी विकीपिडिया या लोकप्रिय एनसायक्लोपिडीया वेबसाईटवर भारतीय महिला खेळाडूंविषयी माहिती उपलब्ध करून देतील.

फोटो स्रोत, Getty Images

विकिपीडियावर नवीन नोंदी कशा करायच्या आणि आधीपासूनच्या नोंदींचा विस्तार कसा करायचा, या संदर्भातील प्रशिक्षण गिल यांनी 'बीबीसी स्पोर्ट्स हॅकथॉन'मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना दिलं.

या वर्षीच्या बीबीसी ISWOTY पुरस्कारासोबत पूरक उपक्रम म्हणून 'बीबीसी स्पोर्ट्स हॅकेथॉन'चं आयोजन करण्यात आलं. लोकांनी केलेल्या मतदानाद्वारे बीबीसी ISWOTY पुरस्कारविजेती निवडली जाते. आठ मार्च रोजी पार पडणाऱ्या आभासी पुरस्कार सोहळ्यामध्ये विजेतीची घोषणा केली जाईल.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)