विनोद दुआ यांची अटक सुप्रीम कोर्टाने थांबवली

विनोद दुआ

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, विनोद दुआ
वाचन वेळ: 1 मिनिटे

पत्रकार विनोद दुआ यांच्या याचिकेवर रविवारी सर्वोच्च न्यायालयात विशेष सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने विनोद दुआ यांची अटक 6 जुलैपर्यंत थांबवली आहे.

जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूनं अफवा पसरवल्याप्रकरणी विनोद दुआ यांनी त्यांच्याविरोधात दाखल होणाऱ्या खटल्यातून सुटका मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात तत्काळ सुनावणीसाठी याचिका दाखल केली होती.

यापूर्वी शुक्रवारी हिमाचल प्रदेशात विनोद दुआ यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि हिमाचल प्रदेश सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं आहे.

विनोद दुआ यांच्याविरोधातील एफआयआर रद्द करण्यात यावी अशी मागणी विनोद दुआंचे वकील विकास सिंह यांनी केली होती. सुप्रीम कोर्टाने ही मागणी मान्य केली नाही. विनोद दुआ यांनी सांगितलं की ते तपासासाठी पूर्ण सहकार्य करतील.

कोरोना
लाईन

फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केला खुलासा

याविषयीची माहिती त्यांनी स्वत: फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली.

ते म्हणाले, आज (शुक्रवार) सकाळी सात वाजता हिमाचल प्रदेश पोलिसांची टीम माझ्या घरी आली. मला एक नोटीस सोपवली आणि उद्या (शनिवारी) सकाळी शिमलास्थित एका पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितलं.

विनोद दुआ

फोटो स्रोत, Getty Images

यापूर्वी भाजपचे प्रवक्ते नवीन कुमार यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं 4 जूनला विनोद दुआ यांच्याविरोधात FIR नोंदवली होती.

विनोद दुआ यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 290 (लोकांमध्ये अशांतता निर्माण करणं), 505 (समाजात अशांतता पसरवणारं वक्तव्य करणं) आणि 505(2) (अपमानकारक टिप्पणी करणाऱ्या सामग्रीची विक्री करणं) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपच्या प्रवक्त्यांनी विनोद दुआ यांच्यावर यूट्यूब चॅनेल HW NEWS वर फेक न्यूजची मार्केटिंग केल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)