कोरोना लॉकडाऊन: लुडोत हरवल्याने नवऱ्याने मोडला बायकोच्या पाठीचा कणा #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्र आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. लुडो खेळात हरवल्याने नवऱ्याने मोडला बायकोच्या पाठीचा कणा
देशात लॉकडाऊन असल्याने लोक घरात बंद आहेत. पण या दरम्यान काही घरांमध्ये कौटुंबिक वाद आणि हिंसा होत असल्याचं दिसून येत आहे.
असाच एक प्रकार गुजरातच्या अहमदाबादमध्ये आढळून आला. इथं लुडो नावाच्या ऑनलाईन खेळात पत्नीने हरवल्यानंतर चिडलेल्या पतीने पत्नीच्या पाठीचा कणा मोडल्याची घटना घडली. ही बातमी सकाळ वेबसाईटनं दिली आहे.

- वाचा- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

181 अभयम हेल्पलाईनवर आलेल्या एका तक्रारीनंतर ही घटना समोर आली. पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. जखमी महिला 24 वर्षांची असून ती घरातच शिकवणी घेते. तर नवरा एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत काम करतो.
2. दात कोरून देश चालवायचा असेल तर अर्थमंत्र्यांची गरज काय? - शिवसेनेचा हल्लाबोल
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं देश लॉकडाउन करून एक महिना झाला आहे. पण त्यानंतर निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी काटकसर सुरू केली आहे. मोदी सरकारकडून करण्यात येत असलेल्या या आर्थिक उपाय योजनांवर शिवसेनेनं सडकून टीका केली.

फोटो स्रोत, ANI
“गावठी उपाय म्हणजे दात कोरून देश चालवण्यासारखं आहे. अर्थव्यवस्थेचे कठोर उपाय म्हणजे जनतेच्याच आतड्यांना व खिशाला कात्री लावणे असेल, तर ते करण्यासाठी अर्थमंत्र्यांची गरज नसते,” अशी टीका शिवसेनेने आजच्या सामनामधील अग्रलेखातून केंद्र सरकारवर केली आहे.
केंद्राने राज्यांचे आर्थिक पालकत्व स्वीकारले नाही तर अनेक राज्ये परावलंबी होतील व कोसळून पडतील. महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर मोठे कर्ज आहे. करोनाच्या लढाईमुळे कर्जाचा डोंगर वाढत जाईल व अशा परिस्थितीत राज्यांना कर्ज कोण देणार? राज्यांनी कर्ज घेण्यापेक्षा केंद्रानेच कर्ज घ्यावे व राज्यांना आर्थिक पॅकेज द्यावे, तेच योग्य ठरेल, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
3. उपकरणे खरेदीची माहिती सार्वजनिक करण्याची काँग्रेसची मागणी
कोव्हिड-19 'विरोधातील लढाईसाठी सरकारकडून आवश्यक उपकरण खरेदी केले जात आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात नफेखोरी आणि अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यामुळे, सरकारने कोरोनाविरोधातील लढ्यासाठी गेल्या महिनाभरात ज्या उपकरणांची खरेदी केली, त्याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केली आहे. याबाबतची बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
245 रुपयांत खरेदी केलेले किट या कंपनीने 'आयसीएमआर'ला 600 रुपयांनी विकले आहे. तर, त्याच कंपनीने हे किट तमिळनाडू सरकारला 400 रुपयांनी विकले आहे. अशा किटचा पुरवठा करणाऱ्या एका कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला आहे. हा प्रकार गंभीर असून, तो कोरोनाविरुद्धच्या लढ्यावर परिणाम करणारा आहे, असे तिवारी यांनी म्हटले आहे. तर राहुल गांधींनीही या चाचणी किटबाबत ट्वीट करून केंद्र सरकारकडे उत्तर मागितलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
4. कोट्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी 100 बस पाठवणार - अनिल परब
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं. त्यामुळे सध्या देशात सामान्य नागरिकांना कुठेही येण्या-जाण्यास, प्रवास करण्यास बंदी आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 2 हजार विद्यार्थी हे राजस्थानमधील कोटा येथे अडकून पडले आहेत.
या विद्यार्थ्यांना आपल्या घरी परत आणण्यासाठी राज्य सरकारने आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकार या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी 100 बस सोडणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
5. सोनिया गांधींवरील वक्तव्याप्रकरणी अर्णब गोस्वामींची 12 तास चौकशी
रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांची मुंबई पोलिसांनी 12 तासाहून अधिक काळ चौकशी केली.
इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या वृत्तानुसार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात 12 तास चौकशी केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नागपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. दंगे भडकवणे, धर्म आणि वंशाच्या आधारावर चिथावणी देणे याबाबत तक्रार नोंदवण्यात आली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








