इन्कम टॅक्स ते रेल कॉरिडोर; देशाच्या अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा जाणून घ्या

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

फोटो स्रोत, SANSAD TV

फोटो कॅप्शन, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण
वाचन वेळ: 7 मिनिटे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेमध्ये सकाळी 11 वाजता 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.

त्यांचं हे भाषण साधारणत: दीड तास चाललं.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे.

'एनडीए' सरकारने 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्याचा पायंडा सुरू केला असून यावर्षीही तो कायम ठेवला आहे.

निर्मला सीतारमण यांचं अर्थसंकल्पीय भाषण तुम्ही 'बीबीसी मराठी'वर इथे लाईव्ह पाहू शकता. हे भाषण तुम्हाला मराठीत पाहता येईल.

अर्थमंत्र्यांच्या या अर्थसंकल्पीय भाषणानंतर शेअर बाजारात जोरदार पडझड झाल्याचं दिसून येत आहे.

सिक्यूरिटीज ट्रान्झेक्शन टॅक्स वाढवल्याने शेअर बाजारावर परिणाम झाल्याचं सांगण्यात येत आहे.

अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा :

  • कॅन्सरसाठीच्या 17 औषधांवरील आयात कर घटवला
  • 7 गंभीर - दुर्मिळ आजारांसाठीच्या औषधांवरील करात घट
  • चामडं आणि कापड उद्योगावरील निर्यात शुल्कात कपात.
  • सौरऊर्जा उपकरणं स्वस्त होणार
  • मायक्रोवेव्हच्या सुट्या भागांवरील आयात करात कपात.
हा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. यात देशाच्या नारीशक्तीचं प्रतिबिंब झळकतं. महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण यांनी विक्रमी नवव्या वेळी अर्थसंकल्प सादर केला. अनेक संधींचा राजमार्ग. वर्तमानातील स्वप्नं साकार करून उज्ज्वल भवितव्याचा पाया रचणारा अर्थसंकल्प. 2047 च्या विकसित भारताच्या उड्डाणाचा हा अर्थसंकल्प आधार आहे. 

नरेंद्र मोदी, पंतप्रधान
  • शेअर्स बायबॅकवर कॅपिटल गेन्स टॅक्स लागणार
  • शेअर बाजारातल्या ऑप्शन ट्रेडिंगवरचा कर वाढला.
  • फ्यूचर्सवरील STT मध्ये कपात
  • भारतातलं डेटा सेंटर वापरून भारतासह जगभरात क्लाऊड सर्व्हिसेस पुरवणाऱ्या कंपन्यांना टॅक्स हॉलिडे, म्हणजे कर नाही.
तरुणांना रोजगार नाही. उत्पादनामध्ये घसरण. गुंतवणूकदार मागे सरकत आहेत. घरगुती बचतीत घसरण. शेतकरी संकटात. जागतिक स्तरावर मिळणाऱ्या धक्क्यांकडे दुर्लक्ष. भारताच्या खऱ्या संकटांकडे दुर्लक्ष करून सुधारणा करण्यास नकार देणारा अर्थसंकल्प.

राहुल गांधी, विरोधी पक्षनेते

गेमिंग आणि कंटेंट क्षेत्रांच्या वाढीवर दिला जाईल भर

  • 2030 पर्यंत दोन दशलक्ष व्यावसायिकांना प्रशिक्षित केले जाईल.
  • 15 हजार माध्यमिक शाळांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब स्थापन केल्या जातील.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

फोटो स्रोत, ANI

नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून अंमलात

  • वित्तीय तूट जीडीपीच्या 4.5% पेक्षा कमी राहील.
  • चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 4.4% राहील.
  • 2026-27 मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या 4.3% राहण्याचा अंदाज आहे.
  • नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून अंमलात येईल.
  • अपघात विमा करमुक्त असेल.
  • लहान करदात्यांसाठी नवीन योजना.
  • ITR-1, ITR -2 भरण्यासाठीची डेडलाईन वाढवली. 31 जुलैपर्यंत रिटर्न भरता येणार
  • परदेशातल्या शिक्षणावरचा TCS 5% वरून 2%
अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा

दिव्यांगजन कौशल्य योजना राबवणार

  • दिव्यांग सहारा योजना - अपंगांना कृत्रिम अवयव, उपकरणं देण्यासाठीची योजना
  • केंद्रीय दिव्याशा केंद्र - अपंग, ज्येष्ठ नागरिकांसाठीची विशेष दुकानं
  • नॅशनल मेंटर हेल्थ इन्स्टिट्यूट - रांची आणि तेजपूर
  • पूर्वेकडच्या शहरात 5 नव्या पर्यटन केंद्रांचा विकास करणार
  • ईशान्येकडच्या राज्यात बुद्धिस्ट सर्किटचा विकास करणार. बौद्ध देवळं - मॉनेस्ट्रीचं जतन, पुनरुज्जीवन करणार.
  • महिला सशक्तीकरणासाठी She-Marts चा स्थापना
YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

दिव्यांगांसाठीच्या रोजगाराच्या - प्रशिक्षणाच्या संधी वाढवणार

  • शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार.
  • दिव्यांगांसाठीच्या रोजगाराच्या - प्रशिक्षणाच्या संधी वाढवणार
  • ईशान्य आणि पूर्वेतल्या राज्यांतल्या नोकरीच्या संधी वाढवणार
  • मत्स्योद्योगासाठीची पुरवठा साखळी सशक्त करणार
  • नारळ, चंदन, कोको, काजू, अगर, बदाम, पाईननट्सच्या उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार.
  • नारळ उत्पादन करणाऱ्या राज्यांसाठी कोकोनट प्रमोशन स्कीम जाहीर
  • नारळ, काजू, कोको प्रक्रिया उद्योगाला चालना देणार
  • चंदन उत्पादन, प्रोसेसिंग वाढीसाठी केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत काम करणार.
  • अक्रोड, बदाम, पाईननट्सचं उत्पादन वाढवणार
  • नारळ संशोधन केंद्राची स्थापना
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

फोटो स्रोत, ANI

पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल कॉरिडोर होणार

  • पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत प्रवासी प्रणालींना प्रोत्साहन देण्यासाठी देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये 7 हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोर विकसित करणार
  • मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बेंगळुरू, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते बेंगळुरू, दिल्ली ते वाराणसी, वाराणसी ते सिलीगुडी असे हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोर होणार विकसित
X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

  • दुसरं कर्तव्य - महत्त्वाकांक्षांना प्रोत्साहन देणं - त्या पूर्ण करणं
  • सेवा क्षेत्रासाठी हाय लेव्हल स्टँडिंग कमिटीची स्थापना. ही समिती वृद्धी, रोजगार, निर्यातीसाठीची क्षेत्र निवडून तिथे चालना देण्यासाठी काम करेल.
  • पुढच्या 5 वर्षांत 1 लाख AHP (Applied Health Professionals) तयार करण्यासाठी प्रयत्न करणार
  • 5 क्षेत्रीय वैद्यकीय हबची स्थापना करणार. भारताला मेडिकल टुरिझमचं केंद्र बनवणार.
  • योगाला जगाच्या अनेक भागांत मान्यता आहे. कोव्हिडनंतर आयुर्वेदाला जागतिक ओळख नव्याने मिळाली.
  • 3 नवीन ऑल इंडिया इन्स्टि. ऑफ आयुर्वेद, आयुष फार्मसी आणि लॅब्सचं आधुनिकीकरण, जामनगरमधल्या सेंटरचं आधुनिकीकरण करणार.
बजेट
  • 12 व्हेटर्नरी आणि पॅरा व्हेटर्नरी कॉलेज - संस्थांची स्थापना करणार
  • भारताल्या व्हिज्युअल इफेक्ट्स - कॉमिक्स सेक्टरसाठी - देशातल्या 15,000 शाळा कॉलेजांत यासाठीच्या लॅब्सची स्थापना करणार
  • नवीन नॅशनल इन्स्टि. ऑफ डिझाईनची पूर्व भारतात स्थापना.
  • 5 य़ुनिव्हर्सिटी टाऊनशिप्सची स्थापना. त्यात विविध शैक्षणिक संस्था - राहण्याची सोय असतील.
  • प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठीच्या एका नवीन हॉस्टेलची स्थापना
  • 4 टेलिस्कोप इन्फ्रा.ची स्थापना करणार वा सुधारणा करणार
  • पर्यटन - नॅशनल इन्स्टि. फॉर हॉस्पिटॅलिटीची स्थापना.
  • 20 पर्यटन स्थळांवरील 10,000 गाईड्सच्या ट्रेनिंगसाठी 12 दिवसांचा कोर्स IIT च्या मदतीने राबवणार.

पाहा अर्थसंकल्पीय भाषण मराठीतून...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यांचं हे भाषण तुम्हाला 'बीबीसी मराठी'वर मराठीतून पाहता येईल.

तसेच, या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला इथे वाचता येतील.

पुणे - हैदराबाद हायस्पीड रेल कॉरिडोर होणार

  • 5 नवीन देशांतर्गत जलमार्ग सुरू करणार. वाराणसी, पाटण्यात देशांतर्गत जलमार्गांसाठीची बोट दुरुस्ती केंद्र सुरू करणार.
  • 7 हाय-स्पीड रेल कॉरिडॉर उभारणार
  • मुंबई - पुणे
  • पुणे - हैदराबाद हायस्पीड रेल कॉरिडोर होणार
  • बँकिग क्षेत्रासाठी उच्चस्तरिय समिती
पुणे - हैदराबाद हायस्पीड रेल कॉरिडोर होणार

'रेअर अर्थ'साठी मोठी घोषणा

  • अर्थमंत्र्यांनी रेअर अर्थसाठी मोठी घोषणा केली आहे.
  • ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये रेअर अर्थसाठी विशेष कॉरिडॉर
  • या कॉरिडॉरला रेअर अर्थ मॅग्नेट कॉरिडॉर असे नाव दिले जाईल.
  • इलेक्ट्रॉनिक्स घटकांच्या निर्मितीसाठी 40 हजार रुपये कोटींचा प्रस्ताव.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

फोटो स्रोत, ANI

'कॉर्पोरेट मित्र योजने'ची घोषणा

  • उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी कॉर्पोरेट मित्र योजनेची घोषणा
  • 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरातल्या पायाभूत सुविधा सुधारणार. 12.2 लाख कोटींचा शहर विकास निधी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

फोटो स्रोत, Getty Images

सेमीकंडक्टर क्षेत्राची क्षमता वाढवण्यावर जोर देणार

  • शहरांमध्ये आर्थिक क्षेत्रं विकसित करणार
  • सेमीकंडक्टर क्षेत्राची क्षमता वाढवण्यावर जोर देणार - सेमीकंडक्टर मिशन 2.0 - 40 हजार कोटींची तरतूद
  • खाणकाम - प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी - रेअर अर्थ मिनरल मायनिंग कॉरिडोर. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये दुर्मिळ खनिज केंद्र उभारणार
  • 3 मोठ्या केमिकल पार्कची स्थापना
  • कंटेनर उत्पादन क्षमता वाढवणार.
  • मेगा टेक्स्टाईल पार्क्सची स्थापना - महात्मा गांधी ग्राम स्वराज योजना - खादी - हातमाग - हस्तकलांना प्रोत्साहन

अर्थसंकल्पाबाबत कोण काय म्हणाले?

गृहमंत्री अमित शहा यांनी अर्थसंकल्पाचं वर्णन "विकसित भारताचा अर्थसंकल्प" असे केले.

अमित शाह यांनी X वर पोस्ट करत म्हटलं की, "उत्पादन ते पायाभूत सुविधांपर्यंत, आरोग्य ते पर्यटन, ग्रामीण भाग ते कृत्रिम बुद्धिमत्ता, क्रीडा ते तीर्थस्थळांपर्यंत, हे बजेट प्रत्येक गाव, शहर आणि शहरातील तरुण, महिला आणि शेतकऱ्यांचे स्वप्न सक्षम करणारे आणि पूर्ण करणारे आहे."

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 बद्दल केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी, "हा एक प्रगतीशील अर्थसंकल्प असून तो भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतो" असं म्हटलं.

"प्रत्येक नागरिकासाठीचा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात ईशान्येकडील अनेक संस्था आणि जलमार्गांसाठी तरतूद करण्यात आली आहे," असंही ते म्हणाले. म्हटलं.

ग्राफिक्स
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातून काहीही मिळालं नसल्याचं म्हटलं. भाषणातून फारच कमी माहिती मिळाली कदाचित बजेटची छापील प्रत पाहून अधिक माहिती मिळेल असंही थरूर म्हणाले.

वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना ते म्हणाले की, "आपण मोठ्या मुद्द्यांकडं पाहिलं तर त्यात मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीयांसाठी काहीही नाही. राज्यांसाठीही त्यात काहीही नव्हतं."

"राजकोषीय विकेंद्रीकरण 41 टक्क्यांवर आहे आणि अनेक राज्यांकडं त्यांच्या नागरिक आणि मतदारांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी पुरेसा पैसाही नाही. हीच आता खरी चिंता बनली आहे," असं थरूर म्हणाले.

"कोणत्या ठिकाणी काय असेल याबद्दलही फारशी माहिती नव्हती. उदाहरणार्थ, केरळमध्ये आम्ही जवळजवळ 15 वर्षांपासून एम्सची वाट पाहत आहोत. याबद्दल कोणतीही घोषणा झाली नाही. अखिल भारतीय आयुर्वेद संस्था स्थापन करण्याचा उल्लेख आहे, पण ती कुठे होणार हेच सांगितलं नाही," असं थरूर म्हणाले.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी 2026 चा अर्थसंकल्प समजण्यापलिकडचा असल्याचं म्हटलं आहे.

अखिलेश यादव म्हणाले की, "गरीब, शेतकरी आणि ग्रामीण भागत राहणाऱ्या लोकांच्या समजण्यापलिकडचा हा अर्थसंकल्प आहे. यामुळं गरिबांचं पोट भरत नाही किंवा नोकऱ्या मिळणार नाहीत. हे फक्त स्वप्नं दाखवणारं बजेट आहे," असं अखिलेश यादव म्हणाले.

आज शेअरबाजार सुरू

रविवारचा दिवस असूनही आज शेअरबाजारात ट्रेडिंग सुरू होतं. BSE आणि NSE दोन्हींमधील व्यवहार आज पूर्ण ट्रेडिंग सेशन सुरू असतील. अर्थसंकल्पांमधल्या घोषणांनंतर गुंतवणूकदारांना लगेचच त्यावर प्रतिक्रिया देता यावी, यासाठी ट्रेडिंग सुरू आहे.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात फक्त दुसऱ्यांदाच शेअरबाजार वीकेंडला सुरू आहे. यापूर्वी गेल्या वर्षी - 2025 मध्ये शनिवारी अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता, तेव्हा देखील शेअर बाजारांचं कामकाज सुरू ठेवण्यात आलं होतं.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा विक्रम

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी अर्थसंकल्प सादर केला.

2026 च्या अर्थसंकल्पाबाबत पंकज चौधरी म्हणाले की, "गेल्या 11 वर्षात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सादर झालेले अर्थसंकल्प देशातील लोकांच्या आकांक्षांवर आधारित होते आणि ते देशाला पुढे घेऊन जाणारे ठरले. आज सादर होणारा अर्थसंकल्प 2047 च्या विकसित भारताला लक्षात ठेवूनच काम करेल.".

केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 ला अंतिम रूप दिल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 ला अंतिम रूप दिल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग नववा अर्थसंकल्प सादर करून देशाच्या संसदीय इतिहासात एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी एकूण 10 अर्थसंकल्प सादर केले होते.

निर्मला सीतारामणदेखील हा अर्थसंकल्प सादर करून त्यांच्या या विक्रमाच्या जवळ जाऊन पोहोचतील. देसाई यांनी 1959-1964 दरम्यान सहा आणि 1967-1969 दरम्यान चार अर्थसंकल्प सादर केले होते.

मात्र, सर्वाधिक सलग अर्थसंकल्प सादर करण्याच्या बाबतीत सीतारमण आघाडीवरच राहतील.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)