म्यानमारच्या रस्त्यांवर सलग चौथ्या दिवशी नागरिकांच्या संतापाचा उद्रेक

व्हीडिओ कॅप्शन, म्यानमारच्या रस्त्यांवर सलग चौथ्या दिवशी नागरिकांच्या संतापाचा उद्रेक

म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता हाती घेतल्यानंतर तीव्र निषेध दर्शवत लोक रस्त्यावर आले आहेत. लष्कराने राजधानीत सुरु असलेल्या आंदोलनात निदर्शकांवर रबर बुलेट डागल्या.

तर मंडाले शहरात अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्याच्याही बातम्या आहेत. लष्कराकडून इशारा मिळूनही लोकांनी चौथ्या दिवशीही निदर्शनं सुरुच ठेवली आहेत.

म्यानमार

फोटो स्रोत, Getty Images

जनतेच्या नेत्या आँग सान स्यू ची या नजरकैदेत आहेत. लष्कर प्रमुखांनी आपल्या भूमिकेचं समर्थन करताना म्हटलंय की गेल्या नोव्हेंबरमध्ये देशात निवडणूक घेण्यास राजकीय नेते अपयशी ठरले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)