BBC EXCLUSIVE: इराणमधली खासगी विमान कंपनी अशी ठरली कोरोना उद्रेकाला कारणीभूत
ही बातमी आहे बीबीसी न्यूज अरेबिकच्या एक्सक्लुजिव्ह संशोधनात्मक पत्रकारितेची. मध्य-पूर्व आशियातल्या काही देशांमध्ये कोव्हिड-19 रोग पसरवण्यात इराणीयन एअरलाईन्सच्या एका विमानाचा हात आहे असं या संशोधनातून स्पष्ट होतं.
फ्लाईट ट्रॅकिंग डेटा आणि हाती लागलेल्या काही व्हीडिओमधून असं स्पष्ट होतंय की, महान एअर कंपनीने आपल्या विमानातून कोव्हिड-19 झालेल्या लोकांची वाहतूक केली. आणि त्यांना इराण, इराक आणि लेबनॉनमध्ये पाठवलं.
विमानातल्या कर्मचाऱ्यांनी याबद्दल आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. पण, तो कंपनीकडून दाबण्यात आला. बीबीसीने महान एअरकडून त्यांची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी प्रत्युत्तर दिलं नाही.
बीबीसी प्रतिनिधी नवल - अल- मगाफी यांचा रिपोर्ट...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)